आयुषचं मागे वळून सडेतोड उत्तर
टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना पाकिस्तानी खेळाडूंनी वारंवार स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जेव्हा आयुष म्हात्रे फक्त 2 रन्सवर आऊट झाला. त्यावेळी तो आऊट होऊन पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा एका पाकिस्तानी खेळाडूने त्याच्यावर कमेंट अन् शिवीगाळ केली. यावर आयुषने मागे वळून सडेतोड उत्तर दिल्याने दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
पाकिस्तानी बॉलरला जागा दाखवली
आयुष म्हात्रे मैदानातून बाहेर गेल्यावर काही वेळाने वैभव सूर्यवंशीला देखील मैदान सोडावं लागलं. त्यावेळी देखील पाकिस्तानने भारतीय खेळाडूंना डिवचलं. त्यावेळी वैभव सूर्यवंशीने देखील पाकिस्तानी बॉलरला जागा दाखवली होती.
संपूर्ण टीम अवघ्या 156 रन्सवर ऑल आऊट
या हायव्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानच्या समीर मिन्हासने झंझावाती बॅटिंग करत 113 बॉल्समध्ये 172 रन्सची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 17 फोर आणि 9 सिक्स लगावत पाकिस्तानला 347 रन्सचा डोंगर उभा करून दिला. 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या मिन्हासने भारतीय बॉलर्सची दाणादाण उडवली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आणि संपूर्ण टीम अवघ्या 156 रन्सवर ऑल आऊट झाली.
आशिया कप जिंकण्याचे स्वप्न भंगलं
टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीने 10 बॉल्समध्ये 26 रन्स करून वेगवान सुरुवात केली होती, मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. मिडल ऑर्डरमध्ये दीपेश देवेन्द्रनने सर्वाधिक 36 रन्स केले, परंतु इतर कोणत्याही बॅट्समनला 20 रन्सचा आकडा पार करता आला नाही. कॅप्टन शुभमन गिलच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या युवा खेळाडूंना पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर टिकता आले नाही आणि आशिया कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.
