एक बाउन्सर 145 किलोमीटर स्पीडने आला अन्...
इंग्लंडचा पहिला डाव सुरू असताना कॅप्टन बेन स्टोक्स मैदानात होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क बॉलिंग करत होता. क्रीजवर बेन स्टोक्स पाय रोवून उभा होता, त्यामुळे स्टार्क काहीसा त्रस्त होता. अशातच स्टार्कने 145 किलोमीटर वेगाने एक बाउन्सर बॉल टाकला. हा वेगाचा मारा इतका अनपेक्षित होता की, स्टोक्सने स्वतःला वाचवण्यासाठी खाली झुकण्याचा प्रयत्न केला, पण बॉल थेट त्याच्या हेल्मेटच्या मागील भागावर जाऊन आदळला.
advertisement
मोठा अनर्थ टळला
हेल्मेटवर बॉल बसताच मैदानावर शांतता पसरली होती, मात्र स्टोक्सने लेटेस्ट मॉडेलचे हेल्मेट घातल्याने मोठा अनर्थ टळला. या हेल्मेटला मागील बाजूने विशेष प्रोटेक्शन देण्यात आले होते, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली नाही. जर हे हेल्मेट जुन्या प्रकारचे असते, तर या घटनेचा परिणाम खूप भयंकर असू शकला असता. या थरारक अनुभवानंतर क्रीडा विश्वात आधुनिक उपकरणांच्या महत्त्वावर चर्चा होत असून, बेन स्टोक्स सध्या सुरक्षित आहे.
फिल ह्यूजचा मृत्यू
दरम्यान, 2013 मध्ये एका शेफील्ड शिल्डमध्ये मॅचमध्ये शॉन अॅबॉट बॉलिंग करत असताना फिल ह्यूजेसच्या डोक्यावर बाउन्सर लागला. त्यामुळे तो तो जमिनीवर बेशुद्ध पडला. त्याचे डोळे घट्ट बंद झाले आणि पुन्हा कधीही उघडले नाहीत. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ह्यूजेसला वाचवता आलं नाही. या घटनेने संपूर्ण क्रिकेट जगत हादरलं होतं. त्यानंतर आता बेन स्टोक्स थोडक्यात वाचल्याचं पहायला मिळालं.
