Bhuvneshwar Kumar UP T20 League : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या विविध लीग सूरू आहेत.या लीगमध्ये अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतायत.अशाच एका खेळाडूने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच ओव्हरला 2 विकेट घेतल्या आहेत.त्यामुळे ही गोलंदाजी पाहून फलंदाजांना घाम फुटला आहे.या संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
युपी टी20 लीगमध्ये मेरठ मेवेरीक्स आणि लखनऊ फॅल्कन यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना सूरू आहे. या सामन्यात लखनऊ फॅल्कनकडून सामन्याची पहिलीच ओव्हर टाकायला आलेल्या भूवनेश्वर कुमारने खरतनाक गोलंदाजी केली आहे.भूवनेश्वर कुमारने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने ही ओव्हर मेडन काढली होती.
मेरठ मेवेरीक्सकडुन अक्षय दुबे आणि स्वस्तिक चिकारा सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. यावेळी भूवनेश्वर कुमारने ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर अक्षय दुबेला आराध्य यादवद्वारे कॅचआऊट केले होते. त्यानंतर रितूराज शर्मा फलंदाजीसाठी आला होता. भूवनेश्वरने यावेळी त्याला अशी गोलंदाजी केली की त्याला कळलेच नाही आणि पाचव्या बॉलवर क्लिन बोल्ड झाला. अशाप्रकारे भूवनेश्वर कुमारने 2 विकेट घेतले होते.
या सामन्यात मेरठ मेवेरीक्सने 20 ओव्हरमध्ये 143 धावा ठोकल्या होत्या. या धावा करण्यात दिव्यांश राजपूतने मोलाची भूमिका बजावली होती. दिव्यांशने 45 बॉलमध्ये 67 धावांची खेळी केली होती. त्याच्या व्यतिरीक्त इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नव्हत्या.त्यामुळे मेरठ मेवेरीक्सने 143 धावाच करून शकल्या. लखनऊ फॅल्कनकडून भूवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन तीन विकेट घेतल्या आहेत. तर हा तोच भूवनेश्वर कुमार आहे ज्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती.
दरम्यान भूवनेश्वर कुमार व्यतिरीक्त अभिनंदन सिंह आणि विपराज निगमने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या. नवनीत कुमारला एक विकेट मिळाली होती. आता लखनऊ फॅल्कन समोर 143 धावांचे आव्हान आहे. हे आव्हान आता लखनऊ गाठते की मेरठ जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.