भारतीय देशांतर्गत हंगाम 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि या हंगामातील पहिल्या स्पर्धेत म्हणजेच दुलीप ट्रॉफीमध्ये 6 संघ सहभागी होतील. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळणारा अर्जुन तेंडुलकर या स्पर्धेसाठी ईशान्य विभागाच्या संघात स्थान मिळवेल अशी अपेक्षा होती.परंतु त्याला दुर्लक्षित करण्यात आले.त्यामुळे संघात स्थान न मिळाल्याने तो दुलीप ट्रॉफीच्या या हंगामात खेळू शकणार नाही.त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
अर्जुन तेंडुलकरने मागच्या रणजी सीझनमध्ये गोव्यासाठी खेळताना प्लेट ग्रुपच्या 4 सामन्यात 16 विकेट घेतले होते. त्यामुळे या टीमने प्लेट डिव्हिजनचा किताब जिंकला होता.अर्जून 2022/23 सीझनपासून गोव्यासोबत आहे. त्यामुळे गोव्यासाठी अर्जुनने दिमाखदार सूरूवात केली होती. आणि डिसेंबर 2023 मध्ये आपल्या पहिल्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये शतक ठोकलं होतं.फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 37विकेट आणि 532 धावा आहेत.
यासोबत नोव्हेंबर 2022 मध्ये गोवासाठी लिस्ट ए मध्ये डेब्यू करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 18 सामन्यात 25 विकेट आणि 102 धावा केल्या होत्या. गोव्यात जाण्यापूर्वी त्याने मुंबईसाठी टी20 मध्ये पदार्पण केले. अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे आणि तो 2021 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे.
दुलीप ट्रॉफीच्या या हंगामात, नॉर्थ-ईस्ट झोनचा पहिला सामना ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील मध्य झोनसोबत होईल. दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. सर्व सामने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळले जातील.
दुलीप ट्रॉफी 2025 साठी ईशान्य विभागाचा संघ
जोनाथन रोंगसेन (कर्णधार), आकाश कुमार चौधरी, तेची डोरिया, युमनुम कर्नजीत, सेदेझाली रुपेरो, आशिष थापा, हेम बहादूर छेत्री, जेहू अँडरसन, अर्पित सुभाष भटेवारा, फिरोझम जोतिन सिंग, पलजोर तमांग, अंकुर मलिक, बिश्वोजित सिंग, बोथराह, बोरजित सिंग, अरपीत सुभाष भटेवरा.
स्टँडबाय: कांशा यांगफो, राजकुमार रेक्स सिंग, बॉबी जोथनसांगा, डिप्पू संगमा, पुखरुम्बम प्रफुल्लमणी सिंग, ली योंग लेपचा, इमलीवाती लेमतूर.