दुबई: आशिया कप 2025ला सुरुवात झाली असून या स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज लढत उद्या होणार आहे. या लढतीआधी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तुम्ही घरी बसून तुमच्या फोनवर पूर्णपणे मोफत पाहू शकता. सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्हवर (Sony Liv) होत आहे. पण यासाठी तुम्हाला वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.
advertisement
जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या कंपन्यांनी असे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत, ज्यात सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. केवळ 95 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्लॅन्सच्या मदतीने तुम्ही संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
जिओचे दमदार प्लॅन्स
445 रुपयांचा प्लॅन: यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. यासोबतच सोनी लिव्ह, झी5, डिस्कव्हरी प्लस अशा अनेक ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. जिओच्या नवव्या वर्धापनदिन ऑफरचाही यामध्ये समावेश आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे.
175 रुपयांचा डेटा पॅक: हा डेटा पॅक तुम्हाला 10 जीबी डेटा आणि 10 ओटीटी ॲप्सचा मोफत ॲक्सेस देतो. याची वैधता 28 दिवसांची आहे.
1049 रुपयांचा प्लॅन: जर तुम्हाला लांबच्या कालावधीसाठी प्लॅन हवा असेल, तर हा प्लॅन उत्तम आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, मोफत एसएमएस आणि सोनी लिव्ह व झी5 सारख्या ॲप्सचा ॲक्सेस 84 दिवसांसाठी मिळतो.
एअरटेलचे पर्याय
979 रुपयांचा प्लॅन: यात तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम मिळते. ज्यामुळे सोनी लिव्हसह 22 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्स मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा, मोफत एसएमएस आणि अमर्यादित 5जी डेटाचाही समावेश आहे. याची वैधता 84 दिवसांची आहे.
449रुपयांचा प्लॅन: कमी बजेटमध्ये हा प्लॅन चांगला आहे. यात तुम्हाला डिस्ने+ हॉटस्टारसोबत एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज ४ जीबी डेटा २८ दिवसांसाठी मिळतो.
279 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅनही शानदार आहे. यात एक्सस्ट्रीम प्ले, नेटफ्लिक्स, झी5 आणि डिस्ने+ हॉटस्टार मोफत मिळतात, सोबतच महिन्याभरासाठी १ जीबी डेटाही उपलब्ध आहे.
181 रुपयांचा डेटा पॅक: एअरटेलचा सर्वात स्वस्त डेटा पॅक आहे. यात तुम्हाला 15 जीबी डेटा आणि 22 ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस एका महिन्यासाठी मिळतो, ज्यात सोनी लिव्हचाही समावेश आहे.
व्होडाफोन आयडिया (Vi) चे प्लॅन्स
175 रुपयांचा प्लॅन: यात तुम्हाला 28 दिवसांसाठी 10 जीबी डेटा मिळतो. सोबतच झी5 आणि सोनी लिव्ह सारखे ॲप्स मोफत मिळतात.
95 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन: या प्लॅनमध्ये 14 दिवसांसाठी 4 जीबी डेटा आणि सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन मिळते.
248 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन एका महिन्यासाठी 6 जीबी डेटा देतो. यामध्ये डिस्ने+ हॉटस्टार आणि सोनी लिव्ह मोफत आहेत.
154 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी 2 जीबी डेटा मिळतो. तसेच झी5, सोनी लिव्ह आणि सनएनएक्सटी (SunNXT) सारखे ॲप्स मोफत उपलब्ध आहेत.
या प्लॅन्समुळे केवळ सामन्यांचा आनंदच दुप्पट होणार सोबत डेटा आणि कॉलिंगची चिंताही दूर होईल. तुम्हाला फक्त रिचार्ज करायचा आहे आणि सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्यायचा आहे.