भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने या धमकीवरून पाकिस्तानला डिवचलं आहे. 'मला वाटत नाही पाकिस्तान असं करू शकतो, मला वाटत नाही, त्यांच्यामध्ये दम आहे. ते नक्की येणार', असं अजिंक्य रहाणे क्रिकबझच्या शोमध्ये म्हणाला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात त्यांचे सामने खेळण्यास नकार दिला आणि सामने श्रीलंकेत हलवण्याचा आग्रह धरला. आयसीसीने बांगलादेशची ही विनंती नाकारली, त्यानंतर बांगलादेशने आपला पवित्रा कायम ठेवला, त्यामुळे बांगलादेशऐवजी स्कॉटलंड वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशला वगळण्याच्या विरोधात बहिष्काराचा इशारा दिला आहे, पण याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागू शकते.
advertisement
आयसीसीचा पाकिस्तानला इशारा
क्रिकबझच्या अहवालानुसार, आयसीसीने आधीच पीसीबीला इशारा दिला आहे की त्यांच्या सहभाग कराराचे पालन न केल्यास गंभीर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. या संभाव्य परिणामांमध्ये निर्बंध, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक स्पर्धांमधून निलंबन आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंचं एनओसी मागे घेणे यांचा समावेश आहे. पीसीबीकडे टी-20 वर्ल्ड कप किंवा 15 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीलंकेत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा कोणताही कायदेशीर आधार नाही, असंही आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.
