विराट कोहली भाचा आर्यवीर कोहली हा साऊथ दिल्ली सुपरस्टार्झ संघात आहे. या संघाचा आज वेस्ट दिल्ली लायन्स सोबत सामना आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या भाच्याला संधी मिळाली नाही आहे. आर्यवीर कोहली हा उजव्या हाताचा लेग स्पिनर गोलंदाज आहे. त्याला एक लाखाच्या किंमतीत साऊथ दिल्ली सुपरस्टार्झ संघात घेतलं होतं.पण अद्याप त्याला संघातून खेळण्याची संधी मिळाली नाही आहे. या संघाचा कर्णधार आयुष बदोनी आहे. आयुष बदोनी या हंगामाच्या पहिल्या सामन्यात देखीव आर्यवीर कोहलीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं होतं.
advertisement
या खेळाडूमुळे पत्ता कट
आयुष बदोनीच्या यां संघात दिग्वेश राठी सारखा आयपीएलचा सुपरस्टार खेळाडू आहे. हा तोच खेळाडू आहे जो आयपीएलमध्ये त्याच्या हटके सेलिब्रेशनमुळे प्रचंड चर्चेत आला होता. विशेष म्हणजे नुसतं हटके सेलीब्रेशन नाही तर तो त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. दिग्वेश राठी हा फिरकी गोलंदाज आहे आणि विराट कोहलीचा भाचा देखील फिरकीपट्टू आहे. त्यामुळे अनुभवाच्या बळावर दिग्वेश राठीला संघात संधी देण्यात आली असल्याचे समजते.
दरम्यान या स्पर्धेआधी आर्यवीरने सीएनएन-न्यूज 18 क्रिकेटनेक्स्टशी बातचित केली होती. यावेळी तो म्हणाला,मी खेळायला आलो आहे आणि मी त्याबद्दलच विचार करतो. खूप उत्साह आहे. हे एक मोठे व्यासपीठ आहे. ते मजेदार असेल. ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप शांत आहे. तयारी चांगली सुरू आहे. सरनदीप सर पहिल्या दिवसापासूनच माझी गोलंदाजी सुधारण्यासाठी मला खूप मदत करत आहेत. मी नक्कीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन, असे आर्यवीर कोहली म्हणालेला.
तो एक चांगला मुलगा आहे, नेटमध्ये खूप कठोर सराव करतो आणि नेहमीच त्याचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.पण सध्या तो खूप तरुण आहे पण त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन करेल, असे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग आर्यवीर बद्दल बोलले होते.