आनंद कुशवाहा आर्थिक अडचणींमुळे बैंगलोरमध्ये जाऊन मजुरी करत होता. त्याची आई धनेसरा देवी अजूनही दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते आणि वडील राजा राम कुशवाहा एकमा बाजारात भाजी विकून घर चालवतात. त्यांच्या घराची अवस्था खूपच वाईट आहे – केवळ ३ छोट्या खोल्यांचं घर, त्यावर छप्पराऐवजी करकटाचं आच्छादन आणि खूपच कमी जागा. अशा परिस्थितीत आनंदच्या यशानं त्यांच्या कुटुंबात आशेचा नवा किरण निर्माण केला आहे.
advertisement
घराच्या परिस्थितीमुळे आनंद बैंगलोरला गेला आणि तिथं मजुरी करताना ड्रीम ११ खेळू लागला. गेल्या २ वर्षांपासून तो हा गेम खेळत होता. सुरुवातीला त्याला ₹22,000 पर्यंत नुकसान झालं होतं, पण त्याने ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली. अखेर, एका रात्री ११ वाजता त्याने वडिलांना फोन करून सांगितलं, “पप्पा, मी एक कोटी रुपये जिंकलोय.” वडिलांना आधी विश्वासच बसला नाही. पण सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी विचारणा केली, मिठाई मागितली, तेव्हा त्यांना समजलं की ही बाब खरी आहे.
घरात उत्साहाचं वातावरण आहे. सर्व नातेवाईक विचारत आहेत की हे सगळं कसं झालं. आनंदच्या जिंकल्यामुळे पहिलं पाऊल म्हणजे घर बांधण्याचं आहे. त्यानंतर घरच्या लोकांसाठी व्यवसाय सुरू केला जाणार आहे. आता दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी जाण्याची गरज राहणार नाही. राजा राम कुशवाहा सांगतात की, “हे एक प्रकारचं जुगारच आहे, त्यामुळे सावध राहावं लागतं. पण आता जे पैसे मिळाले आहेत, त्याचा योग्य वापर केला जाईल. घर बांधलं जाईल, दुकान सुरू केली जाईल, मुलांना शिक्षण दिलं जाईल आणि आता आपल्यालाही गावातच व्यवसाय करण्याची संधी मिळेल.”
(डिस्क्लेमर: ड्रिम 11 वर खेळणं अत्यंत जोखमी आणि धोकादायक आहे. त्यामुळे पैसे लावण्याआधी विचार करा. त्यातील नफ्या तोट्यासाठी न्यूज18 मराठी जबाबदार राहणार नाही. या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणं आहे. ड्रिम11 मध्ये पैसे लावण्याचे कोणतेही समर्थन न्यूज18 मराठी करत नाही.)