ट्रेव्हिड हेडचा कॅच सुटला
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड याने आपल्या घरच्या मैदानावर अप्रतिम फलंदाजी करत 146 बॉल्समध्ये कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावले. पण 99 वर असताना ट्रेव्हिड हेडचा कॅच सुटला. हॅरी ब्रुक याच्याकडून चूक झाली अन् ट्रेव्हिस हेडला जीवदान मिळालं. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये हेडने शतक ठोकत इतिहास रचला.
advertisement
रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
या शतकासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे. रोहितच्या नावावर 9 शतकं होती, तर हेडने आता 10 वे शतक झळकावून शुभमन गिल याच्याशी बरोबरी केली आहे. या यादीत इंग्लंडचा जो रूट सध्या अव्वल स्थानी आहे.
ॲलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर 371 रन्स
मॅचच्या स्थितीचा विचार केला तर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ॲलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर 371 रन्स केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 286 रन्सवर ऑल आऊट झाला. 85 रन्सची महत्त्वाची आघाडी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावून 210 रन्स केले असून, त्यांची एकूण लीड आता 295 रन्सवर पोहोचली आहे. या स्थितीतून इंग्लंडला पुनरागमन करणं कठीण दिसत आहे.
दुसऱ्या डावात परिस्थिती काय?
दरम्यान, उस्मान ख्वाजा याने हेडला साथ दिली अन् त्याने 40 धावा केल्या. तसेच अलेक्स कॅरी याने 52 धावांची संयमी खेळी केली अन् ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास मदत केलीये. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत असल्याचं पहायला मिळतंय.
