खरं लखनऊ सूपर जाएंट्सचा बॉलर दिग्वेश राठी हा त्याच्या नोटबुक सेलीब्रेशन वरून आयपीएलमध्ये प्रचंड चर्चेत आला होता. या सेलिब्रेशनवरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे. मात्र तरी देखील तो नोटबुक सेलीब्रेशन काय थांबवत नाही आहे. आता दोन दिवसांपूर्वीच्या सामन्यात राठीने अभिषेक शर्माची विकेट घेताना पुन्हा नोटबुक सेलिब्रशन केले होते. यावरून अभिषेक शर्मा आणि राठीमध्ये मोठा वाद देखील झाला होता.
advertisement
या वादानंतर दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी घालण्याल आली होती.यामुळेच आजच्या गुजरात विरूद्धच्या सामन्यात त्याला संघात संधी मिळाली नाही. त्याच्या जागी आज आकाश सिंहला खेळवले होते. याच आकाश सिंहने आता दिग्वेश राठीची आज प्रॉक्सी सही मारली आहे.
त्याचं झालं असं की बटलर 33 धावांवर खेळत असताना आकाश सिंहने त्याला क्लिन बोल्ड केले होते.यानंतर आकाश सिंहने डगआऊटकडे इशारा करत नोटबुक सेलीब्रेशन म्हणजेच सही केली. त्यामुळे नेहमी मैदानावर सही करणाऱ्या दिग्वेश राठीच्या जागी आज आकाश सिंह प्रॉक्सी साईन करून गेला.आकाश सिंहच्या या सेलिब्रेशनचा आता व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दरम्यान याआधी फिल्डींग करताना आकाश सिंहच्या हाताला दुखापत झाली होती. यावेळी त्याच्या हातातून रक्त देखील आले होते. त्यानंतर फिजिओने तत्काळ मैदानावर येऊन त्याच्यावर उपचार केले होते.
हे आव्हान आता गुजरात पुर्ण करते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंतने आजच्या सामन्यात खतरनाक शॉर्ट खेळला आहे.या शॉर्टची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं गुजरातच्या ओव्हरचे 10 बॉल उरले असताना रिषभ पंत मैदानावर आला होता. त्यावेळी धावसंख्या 212 पर्यंत पोहचली होती.यावेळी पंत एक रन काढून स्ट्राईक पूरनला दिली. त्यानंतर शेटवच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पंतने सिक्स मारला.त्यानंतर पाचव्या बॉलवर रिषभ पंतने सिक्स ठोकला होता.पंतचा हा नो लूक शॉट होता. हा शॉर्ट पाहून स्टेडिअममधले सगळेच अवाक झाले होते. या सिक्सचा आता व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा