T20 world cup 2026 Team India Sqaud : आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 ला अजून 49 दिवस उरले आहेत. या स्पर्धेआधी टीम इंडियाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.या संघातून शुभमन गिल आणि जितेश शर्मा बाहेर झाला आहे.तर ईशान किशन आणि रिंकु सिंहची एंन्ट्री झाली आहे. दरम्यान या 15 सदस्यीय संघातून आता भारताच्या दिग्गज खेळाडूने एका हुकमी एक्का निवडला आहे.हा खेळाडू टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यास मदतगार ठरू शकतो.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपट्टू हरभजन सिंहने त्याच्या युट्यूब चॅनलवर भविष्यवाणी केली आहे. भारताच्या बॉलिंग अटॅकमध्ये सर्वात मोठा एक्स-फॅक्टर म्हणून गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचे नाव घेतले आहे. माझा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड, वरुण चक्रवर्ती. तो एक हुशार गोलंदाज आहे. मला वाटते की तो फरक असेल आणि बुमराह जिंकणे आणि हरणे यात फरक असेल. ज्या दिवशी दोघांचा दिवस चांगला असेल, त्या दिवशी टीम इंडिया सामना जिंकेल, असे हरभजन म्हणाला आहे.
भारताच्या संघातील सर्व गोलंदाज खरे विकेट घेणारे आहेत आणि जर संघाला फिरकीला अनुकूल किंवा किंचित हळू खेळपट्ट्या मिळाल्या तर ते कोणत्याही प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवू शकतील,असे हरभजनने सांगितले आहे.
“पूर्वी, भारताची फलंदाजी नेहमीच मजबूत होती, परंतु गोलंदाजीत नेहमीच अशी भावना होती की कुठेतरी चुका होतील किंवा धावा मोठ्या प्रमाणात दिल्या जातील. परंतु या संघात बुमराह, अर्शदीप, वरुण चक्रवर्ती, जर तो खेळला तर वॉशिंग्टन आणि अक्षर आहेत. हे सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत. आणि जर कुलदीप यादवला संधी मिळाली तर ते परिस्थिती आणि मैदानांवर अवलंबून असेल. जर सामने फिरकीला अनुकूल किंवा किंचित हळू खेळपट्ट्यांवर खेळले गेले तर भारत सर्वांना सहज मागे टाकेल, असे हरभजन म्हणाला आहे.
दरम्यान टीम इंडियाने अलीकडेच पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला, ज्यामध्ये चार डावांमध्ये 10 बळी घेतल्यानंतर वरुण चक्रवर्तीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता.
