अन् राग श्रीसंतवर काढला
मॅच संपल्यानंतर हरभजन सिंगने श्रीशांतला कानशिलात मारली. त्यानंतर श्रीशांत मीडियाशी बोलताना म्हणाला की मॅचदरम्यान हरभजनने त्याला 'लूझर' म्हटलं होतं, त्यामुळे तो रडू लागला होता. पण नंतर श्रीशांतने आपलं वक्तव्य बदललं. आयपीएलमध्ये हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता आणि मॅचमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. याच कारणांमुळे तो निराश झाला होता आणि त्याचा राग श्रीशांतवर काढला, असं अनेकांचं म्हणणं होतं. या घटनेनंतर, हरभजनने श्रीशांतला मारल्याचं कबूल केलं.
advertisement
पाहा Exclusive व्हिडीओ
या घटनेनंतर, बीसीसीआयने हरभजन सिंगवर 11 मॅचची बंदी घातली होती. तसेच, त्याला आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून निलंबित करण्यात आलं होतं. या घटनेमुळे हरभजनला मोठा दंडही भरावा लागला होता. या प्रकरणी श्रीशांतने हरभजनला माफ केलं आणि दोघांनीही पुन्हा एकत्र खेळायला सुरुवात केली. पण ही घटना आयपीएलच्या इतिहासातील एक सर्वात वादग्रस्त घटना म्हणून आजही ओळखली जाते.
श्रीसंतच्या मुलीला भेटलो होतो तेव्हा...
दरम्यान, मी ती घटना माझ्या करिअरमधून कायमची हटवू इच्छितो. हीच ती घटना आहे जी मी माझ्या आयुष्यात दूर करेन. जे काही घडलं ते चुकीचं होतं आणि मला तसं वागायला नको होतं. मी 200 वेळा माफी मागितली. मला इतक्या वर्षानंतरही या गोष्टीचं वाईट वाटतं. मी श्रीसंतच्या मुलीला भेटलो होतो तेव्हा तू माझ्या वडिलांना मारलं आहे. हे तिचे ऐकून माझं हृदय पिळवटून निघालं. मला रडायला आलं, असं हरभजन सिंग म्हणतो.