व्हिडिओमध्ये हार्दिक आणि त्याचा कुत्रा दोघेही एकत्र धावताना दिसत आहेत. हार्दिकच्या या अनोख्या व्यायामाच्या क्षणाने हे सिद्ध केले आहे की, फिटनेस आणि मजा एकत्र जाऊ शकतात. अनेकदा खेळाडूंचे वर्कआउट व्हिडिओ गंभीर आणि कठोर स्वरूपाचे असतात, पण हार्दिकने आपल्या पाळीव मित्रासोबतचा हा व्हिडिओ शेअर करून एक वेगळा संदेश दिला आहे. मात्र, काहींनी पांड्याला ट्रोल केलंय. पांड्याने हा व्हिडीओ इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय.
advertisement
पाहा Video
या व्हिडिओला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. हार्दिकच्या फिटनेसप्रती असलेल्या कटिबद्धतेचे आणि त्याचबरोबर त्याच्या प्राण्यांवरील प्रेमाचेही यातून दर्शन घडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे. परंतू, कुत्र्याला एवढ्या वेगाने का पळवलं? असा सवाल काही नेटकरी विचारत आहेत.
दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. तो सध्या इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही, कारण तो प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (वनडे आणि टी-२०) खेळतो. पुढील मॅचबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या तरी बीसीसीआयने आगामी T20I किंवा ODI मालिकेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे आता पांड्या कधी मैदानात दिसेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.