TRENDING:

Hardik Pandya चा दुसऱ्यांदा 'हॉर्ट ब्रेक‍, रूमर्ड गर्लफ्रेंडनेही सोडली साथ, Break UPच्या चर्चांना उधाण

Last Updated:

हार्दिक पांड्या घटस्फोटानंतर रुमर्ड गर्लफ्रेड जास्मिन वालियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र आता दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hardik Pandya Jasmin Walia : टीम इंडियाचा अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पण सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. कारण हार्दिक पांड्याचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सूरू आहे. हार्दिक पांड्या घटस्फोटानंतर रुमर्ड गर्लफ्रेड जास्मिन वालियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र आता दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
hardik pandya jasmin walia breakup rumour
hardik pandya jasmin walia breakup rumour
advertisement

बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकश सोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्या एका ब्रिटिश गायिकेला डेट करत असल्याची चर्चा सूरू झाली होती.ही भारतीय वंशाची ब्रिटिश गायिका जास्मिन वालिया होती. हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सूरू होती. परंतु आता दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे, त्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना ऊत आले आहे.

advertisement

हार्दिक पांड्या आणि जास्मिन यांच्यातील लिंकअपची बातमी पहिल्यांदा समोर आली जेव्हा दोघांनीही आपापल्या इंस्टाग्रामवर त्याच ठिकाणाचा फोटो शेअर केला.त्यानंतर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सामन्यादरम्यान जास्मिन स्टेडियममध्ये दिसली तेव्हा दोघांच्या रिलेशनशिपमधील चर्चांना उधाण आले होते.इतकंच नाही तर इंडियन प्रीमियर लीग 2025 दरम्यानही जास्मिन मुंबई इंडियन्स संघाच्या फॅमिली बसमध्ये प्रवास करतानाही दिसली होती.अशा परिस्थितीत हार्दिक आणि जास्मिनमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याची चर्चा सूरू होता. पण दोघांनीही त्यांच्या नात्यांबद्दल उघडपणे बोलणे टाळले होते.

advertisement

'त्या' पोस्टवून ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

हार्दिक आणि जास्मिन वालिया यांच्या ब्रेकअपची चर्चा अलीकडेच रेडिट पोस्ट व्हायरल झाल्यामुळे वाढली. एका युझरने पोस्ट केले होते की,'हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे का? मी अलीकडेच तपासले की ते आता एकमेकांना फॉलो करत नाहीत. काय चाललंय?' या पोस्टनंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी वाऱ्यासारखी पसरली.पण हार्दिक आणि जास्मिन यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

advertisement

नताशा स्टॅन्कोविचशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चेत असतो. अलिकडेच, हार्दिक पंड्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताची एक मुलाखतही व्हायरल झाली.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya चा दुसऱ्यांदा 'हॉर्ट ब्रेक‍, रूमर्ड गर्लफ्रेंडनेही सोडली साथ, Break UPच्या चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल