खरं तर क्वालिफायर सामन्यात टॉस दरम्यान भयंकर राडा झाला होता. टॉस झाल्यानंतर दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करतात. पण काल हार्दिक आणि गिलमध्ये हस्तांदोलनच झाले नव्हते.त्यामुळे शुभमन गिलने कर्णधार बनताच अॅटीट्यूड दाखवल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मैदानात देखील शुभमन गिलची विकेट पडताच हार्दिकने त्याच्यासमोर जाऊन आक्रामक सेलिब्रेशन केले होते.त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बिनसल्याची चर्चा रंगली होती.
advertisement
भांडणाला दोन्ही खेळाडूंचा दुजोरा
कालच्या मैदानातील भांडणावर आता शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात काहीच वाद नाही, आमच्यात फक्त प्रेम असल्याचे शुभमन गिलेने हार्दिक पंड्याला टॅग करून सांगितले होते.तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर अजिबात विश्वास ठेवू नका असे आवाहन शुभमन गिलने चाहत्यांना केले होते.
शूभमनच्या या पोस्टनंतर आता वादावर हार्दिक पंड्याने देखील प्रतिक्रिया दिला आहे.माझं ही तुझ्यावर प्रेम आहे शुभू बेबी अशी शूभमनचीच पोस्ट रिशेअर करून हार्दिकने उत्तर दिलं आहे.त्यामुळे आता वादावर पडदा पडला आहे.
हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल भांडल्याच्या फक्त सोशल मीडियावर चर्चा होत्या. मात्र आता शुभमन गिल आणि हार्दिक पंड्याने यावर प्रतिक्रिया देऊन त्यांच्यात खरं भांडण झालेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.