नसीम शहा अस्खलित मराठीमध्ये बोलताना
पाकिस्तानी क्रिकेटर सध्या ILT20 लीगमध्ये खेळत आहे. त्याला तिथं एक मराठी सहकारी भेटला. त्याकडून नसीम शहा याने मराठी शिकून घेतली. एका व्हायरल व्हिडीओमध्ये नसीम शहा मराठीमध्ये बोलताना दिसला. चहा पेयला चला, म्हणत तो सहकाऱ्यासोबत चहा पेयला गेला. तिथं गेल्यावर त्यावर देखील त्याने मराठी सोडली नाही. आता मला बरं वाटतंय, असं नसीम शहा म्हणाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय. पाकिस्तानी खेळाडूंचे अकाऊंट भारतीयांसाठी बॅन असले तरी सोशल मीडियावरून व्हिडीओ ट्रेंडिग होतोय.
advertisement
इंटरनॅशनल लीगमध्ये जगभरातून लोक येत असतात. कुणी पाकिस्तनमधून येतं तर कुणी इंडियामधून येतं.. तर कुणी ऑस्ट्रेलियातून येतं. क्रिकेट एक असा खेळ आहे तिथं सर्वजण एकत्र येतात. आता आम्हाला इथं एक महिना सोबत रहायचंय म्हटल्यावर नक्कीच आम्ही त्यांच्याकडून काही ना काही शिकतो आणि ते आमच्याकडून काही ना काही शिकत असतात, असं नसीम शहा मिळाला.
दरम्यान, क्रिकेटची ही चांगली गोष्ट आहे की, सामना जेव्हा खोलातच जातो तेव्हा प्रेक्षकांना देखील आनंद मिळतो आणि खेळाडूंना देखील शिकायला मिळतं. त्यामुळे क्रिकेटच्या क्वालिटीसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असंही नसीम शहा म्हणाला.
