TRENDING:

टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत, वर्ल्ड कपमधूनही बाहेर

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज आणि वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज आणि वर्ल्ड कपमधून भारतीय खेळाडू दुखापतीने बाहेर झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज आणि वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची स्टार खेळाडू आणि विकेट कीपर ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 वनडे मॅचची सीरिज आणि वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. यास्तिका भाटिया दुखापतीमुळे दोन्ही स्पर्धांमधून बाहेर झाली आहे, त्यामुळे निवड समितीला शेवटच्या क्षणी टीममध्ये बदल करावे लागले आहेत.
टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत, वर्ल्ड कपमधूनही बाहेर
टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत, वर्ल्ड कपमधूनही बाहेर
advertisement

विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाचा कॅम्प सुरू असताना यास्तिका भाटियाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे ती ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज आणि वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या यास्तिका भाटियाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज आणि वनडे वर्ल्ड कपसाठी यास्तिका भाटियाच्या ऐवजी उमा चेत्रीची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीम

advertisement

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड, सायली सतघरे, राधा यादव, श्री चरनी, स्नेह राणा, उमा चेत्री

स्टॅण्ड बाय खेळाडू

तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड, अमनज्योत कौर, राधा यादव, श्री चरनी, स्नेह राणा, उमा चेत्री

advertisement

स्टॅण्ड बाय खेळाडू

तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, मिन्नू मनी, सायली सतघरे

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत, वर्ल्ड कपमधूनही बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल