टीम इंडियात दोन बदल
कर्णधार शुभमन गिलने टीम इंडियात दोन बदल केले असून, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. तर अर्शदीप सिंग अन् नितीश कुमार रेड्डी यांना बाहेर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुभमन गिलने असा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. टीम इंडियाच्या या निर्णयात गौतम गंभीरचा हात असल्याचं स्पष्ट दिसून आलंय.
advertisement
हर्षित राणासाठी स्वत:चा नियम मोडला
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नंबर 8 पर्यंत बॅटर असायला हवेत, असा हेड कोच गौतम गंभीरचा नियम आहे. परंतू गंभीरने हर्षित राणासाठी स्वत:चा नियम मोडला. कुलदीप यादवला संधी देताना गंभीरने हर्षित राणाला नाही तर नितीश कुमार रेड्डीला बाहेर बसवलं. त्यामुळे आता हर्षित राणाच्या बॅटिंगवर गंभीर इतका भरोवसा आहे का? असा सवाल विचारला जातोय. टॉसनंतर बीसीसीआयने ट्विट देखील केलंय.
नितीश कुमार रेडीला क्वाड्रिसेप्सची दुखापत
अॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान नितीश कुमार रेडीला डाव्या क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली आणि त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडीसाठी तो उपलब्ध नव्हता. बीसीसीआयची वैद्यकीय टीम दररोज त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, असं बीसीसीआयच्या हँडलवरून सांगण्यात आलंय.
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (Playing XI): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, त्यालाही प्रथम बॉलिंग करायला आवडले असते. स्कोरबोर्डवर एक लक्ष्य निश्चित करून त्याचा पाठलाग करणे सोपे जाते. तो म्हणाला की, "मागच्या मॅचमध्ये आम्ही पुरेसे रन बनवले होते, पण आम्हाला मिळालेल्या संधी आम्ही साधू शकलो नाही. क्रिकेटच्या खेळात हे घडतं आणि तुम्हाला तुमच्या संधीचा फायदा घ्यावा लागतो. 40 व्या ओव्हरपर्यंत मॅच बरोबरीची होती, पण शेवटी त्यांनी चांगली कामगिरी केली. आशा आहे की ही मॅच आमच्यासाठी चांगली असेल." संघात दोन बदल करण्यात आले असून, कुलदीप आणि प्रसिद्ध हे अर्शदीप आणि रेड्डी यांच्या जागी संघात परतले आहेत.
