India vs Australia : भारताने दुसरा वनडे सामनाही हारला आहे.कारण ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेटस आणि 22 बॉल राखून पराभव केला होता. या पराभवानंतर भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धची मालिका गमावली आहे. आता या मालिकेतला शेवटचा सामना हा उद्या 25 ऑक्टोबर शनिवारी खेळवला जाणार आहे.या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मोठं विधान केलं आहे. रोहित शर्माला ज्या प्रमाणे कर्णधार पदावरून काढलं गेले, त्याप्रमाणे तो शांतपणे उभं राहुन काल मॅच खेळ शकला असता, पण त्याने तसं न करता आपला सगळा अनुभव शुभमन गिलच्या पाठिशी लावला होता,असे मोहम्मद कैफने सांगितलं आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
advertisement
मोहम्मद कैफने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मौहम्मद कैफने कर्णधार पदावरून काढल्यानंतर रोहित शर्माची एक वेगळी बाजू सांगितली आहे. अंडरप्रेशर सामन्यात रोहित शर्मा चांगला खेळला. कर्णधार शुभमन गिल आऊट झाला, विराट कोहली आऊट झाला. त्यानंतर रोहित एकटा उभा राहिला आणि धावा करून गेला. इतकंच नाही तर तो ज्याप्रकारे मैदानावर शुभमन गिलसोबत वागला, तो पाहता तो किती चांगला माणूस आहे, हे स्पष्ट होते. कारण तो भारताला पराभूत होताना पाहू शकत नाही. रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढलं तरी तो नवीन कर्णधार शुभमन गिलसोबत उभा राहिला. भारत पराभवाच्या उंबरठ्यावर होता तेव्हा देखील रोहित गिलला समजावत होता. आपल्याला जिंकायचं आहे,असे मोहम्मद कैफने सांगितलं.
रोहित शर्माच्या नसानसात भारत आहे. तो हिंदुस्थानला धोका देऊ शकत नाही. कारण धावा केल्यानंतर अनेक खेळाडू बाजूला उभे राहतात. कारण धावा केल्या आता आपलं काम संपलं आता गिल बघून घेइल.पण रोहित शर्मा अर्शदिप सिंह सोबत बोलला. शुभमन गिलसोबत बातचित केली, खेळाडूंची फिल्डींगही सेट केली. जसं आपण त्यांच्यासोबत वागलो आहोत. त्याच्याकडे संधी होती की तो शांतपणे उभा राहु शकला असता.पण तसा तो नाही आहे.त्याला नेहमी वाटते भारत जिंकावा.त्यामुळे रोहितने त्याला सपोर्ट केला आहे. पण जरी भारत हारला असला तरी रोहित शर्माने त्याचा सगळा अनुभव गिलच्या पाठीशी लावला होता, अशा शब्दात मोहम्मद कैफने रोहित शर्माच कौतुक केलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
