कुलदीप आणि प्रसिद्ध कृष्णा प्लेइंग इलेव्हनमध्ये
कर्णधार शुभमन गिलने आपल्या संघात दोन बदल केले असून, तो कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन आला आहे. कोहलीसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अपयशी ठरल्यास त्याच्या वन-डे करिअरवर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहू शकतात. कोहलीने या सिरीजमधील पहिल्या दोन्ही मॅचमध्ये एकही रन न करता (डक) आऊट होण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यामुळे आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष असणार आहे.
advertisement
मॅच आमच्यासाठी चांगली असेल - शुभमन
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, त्यालाही प्रथम बॉलिंग करायला आवडले असते. स्कोरबोर्डवर एक लक्ष्य निश्चित करून त्याचा पाठलाग करणे सोपे जाते. तो म्हणाला की, "मागच्या मॅचमध्ये आम्ही पुरेसे रन बनवले होते, पण आम्हाला मिळालेल्या संधी आम्ही साधू शकलो नाही. क्रिकेटच्या खेळात हे घडतं आणि तुम्हाला तुमच्या संधीचा फायदा घ्यावा लागतो. 40 व्या ओव्हरपर्यंत मॅच बरोबरीची होती, पण शेवटी त्यांनी चांगली कामगिरी केली. आशा आहे की ही मॅच आमच्यासाठी चांगली असेल." संघात दोन बदल करण्यात आले असून, कुलदीप आणि प्रसिद्ध हे अर्शदीप आणि रेड्डी यांच्या जागी संघात परतले आहेत.
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (Playing XI): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
