रोहितचा ऑस्ट्रेलियामध्ये विक्रम
या शतकासोबतच रोहितने बरेच विक्रमही केले आहेत. एका टीमविरुद्ध सर्वाधिक वनडे शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता 9 वनडे शतकं आहेत. सचिन तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वनडे शतकं केली होती, तर विराट कोहलीची वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतकं आहेत. या यादीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 शतकं केली आहेत.
advertisement
रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियामधलं वनडे क्रिकेटमधलं हे 6 वे शतक होते. ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने 33 वनडे इनिंगमध्ये बॅटिंग केली आहे. परदेशी खेळाडूने ऑस्ट्रेलियामध्ये मारलेली ही सर्वाधिक वनडे शतकं आहेत. या यादीत विराट कोहली 5 शतकांसह दुसऱ्या आणि कुमार संगकारा 5 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये 32 वनडे इनिंगमध्ये आणि संगकाराने 49 वनडे इनिंगमध्ये बॅटिंग केली आहे.
रोहितचं 50वं शतक
रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे 50 वे शतक होतं. रोहितच्या नावावर टेस्टमध्ये 12, वनडेमध्ये 33 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 5 शतकं आहेत. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त शतकं असणारा रोहित शर्मा हा जगातला एकमेव खेळाडू आहे.
