रोहित शर्माने आधी कर्णधार गिलसोबत 69 रनची पार्टनरशीप केली. 24 रन करून गिल माघारी गेला, यानंतर रोहितने विराटसोबत नाबाद शतकी पार्टनरशीप केली, त्यामुळे टीम इंडिया विजयाच्या जवळ पोहोचली. रोहित शर्माच्या शतकासोबतच विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावलं आहे. याआधी पर्थ आणि ऍडलेडमध्ये विराट लागोपाठ 2 सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाला होता.
रोहितने केली बोलती बंद
advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजआधी निवड समिती आणि बीसीसीआयने रोहित शर्माकडून वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतली आणि गिलला कर्णधार केलं, यावरून निवड समितीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. तसंच रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले. 2027 च्या वर्ल्ड कपला रोहित शर्मा 40 वर्षांचा होईल, त्यामुळे त्याचं खेळणं कठीण आहे, असंही बोललं गेलं. तसंच निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनीही विराट-रोहित 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळलं, त्यामुळे हा वाद आणखी वाढला. आता रोहितने आधी अर्धशतक आणि आता शतक करून आपण 2027 वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा 236 वर ऑलआऊट
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉलर्सनी अचूक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाचा 46.4 ओव्हरमध्ये 236 रनवर ऑलआऊट केला. हर्षित राणाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, याशिवाय वॉशिंग्टन सुंदरला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून रेनशॉने सर्वाधिक 56 रनची खेळी केली, तर मिचेल मार्शने 41 रन केले.
