TRENDING:

IND vs AUS 4th Test:ऑस्ट्रेलियाकडून झाली मोठी चूक; टीम इंडियाला हलक्यात घेतले, मेलबर्न मैदानावर उद्या इतिहास घडणार?

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मेलबर्न: बॉक्सिंग डे कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया भारताला ३३४ किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे लक्ष्य देऊ शकते. कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इतक्या मोठ्या लक्ष्याचा मेलबर्न मैदानावर पाठलाग करणे हे सोपे नाही. पण ही गोष्ट भारतासाठी अशक्य देखील नाही. कारण भारताने २०२१ मध्ये ब्रिस्बेन येथे ३२८ धावांचे टार्गेट यशस्वीपणे पार केले होते.
News18
News18
advertisement

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ९ बाद २२८ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्यांनी १०५ धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडे ३३३ धावांची आघाडी आहे. जर त्यांनी डाव जाहीर केला तर भारताला ३३४ धावांचे लक्ष्य मिळेल आणि फलंदाजी केली तर यात आणखी थोड्या धावांची भर पडेल.

मेलबर्न मैदानावरील रेकॉर्ड (Highest Run Chases At Melbourne)

advertisement

मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर सर्वात मोठ्या धावसंख्याचे पाठलाग करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी १९२८ साली ३२२ धावांचे टार्गेट पार केले होते. आता भारताला ३३४ किंवा त्यापेक्षा अधिक धावा कराव्या लागू शकतात. जे या मैदानावर कधीच झाले नाही. असे असले तरी रवी शास्त्री आणि संजय मांजरेकर यांना भारताच्या विजयाची आशा आहे आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे टीम इंडियाची कामगिरी होय.

advertisement

मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला किती ओव्हर्स मिळणार?

भारताने ३ वर्षांपूर्वी ब्रिस्बेन मैदानावर ३२८ धावांचे टार्गेट पार केले होते. त्या संघातील अर्धे खेळाडू आता मेलबर्न कसोटी खेळत आहेत. ऋषभ पंतने तेव्हा शानदार खेळी करत विजय मिळून दिला होता. इतकच नाही तर भारत हा जगातील असा पहिला देश आहे ज्याने कसोटीत ४००हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. १९७६ साली टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या डावात ४०६ धावांचा टार्गेट पार केले होते. तर इंग्लंडविरुद्ध ३८७ धावा करून सामना जिंकला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

भारताच्या फलंदाजीवर नजर टाकली तर आठव्या क्रमांकापर्यंत धावा करणारे खेळाडू आहेत. चौथ्या डावात भारताला चांगली सुरूवात मिळाली तर ऑस्ट्रेलियाचा मेलबर्नवर पराभव शक्य आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 4th Test:ऑस्ट्रेलियाकडून झाली मोठी चूक; टीम इंडियाला हलक्यात घेतले, मेलबर्न मैदानावर उद्या इतिहास घडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल