मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आज शनिवारी भारतीय संघाची घोषणा झाली. टीम इंडिया या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळणार आहे. या मालिकेसह भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा पर्व संपून गिल पर्वाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. निवड समितीने रोहितच्या जागी वनडेचा कर्णधार म्हणून गिलची निवड केली आहे. याआधी गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. सध्या टी-20चा कर्णधार सूर्यकुमार यादव असून भविष्यात ही जबाबदारी देखील गिलकडे येण्याचे संकेत निवड समिती प्रमुख आजित आगरकर यांनी दिले आहेत.
advertisement
भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात 19 ऑक्ट्रोबरपासून होईल. टीम इंडिया प्रथम वनडे मालिका खेळणार आहे. पहिली वनडे पर्थ स्टेडियमवर 19 ऑक्टोबरला त्यानंतर 23 ऑक्टोबरला दुसरी वनडे अॅडलेड ओव्हलवर आणि 25 ऑक्टोबरला अखेरची वनडे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होईल.
वनडे मालिकेनंतर 29 ऑक्टोबरला कॅनबेरामधील मनुका ओव्हलवर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर 31 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर, 2 नोव्हेंबरला होबार्टमधील बेलरिव्ह ओव्हलवर, 6 नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट स्टेडियमवर आणि 8 नोव्हेंबरला ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिमवर मॅच होईल.
दिनांक | सामना | स्थळ | वेळ (भारत) | ||
---|---|---|---|---|---|
19 ऑक्टोबर, रवि | 1ली वनडे | पर्थ स्टेडियम, पर्थ | सकाळी 9:00 | ||
23 ऑक्टोबर, गुरु | 2री वनडे | अॅडलेड ओव्हल, अॅडलेड | सकाळी 9:00 | ||
25 ऑक्टोबर, शनि | 3रा वनडे | सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी | सकाळी 9:00 | ||
29 ऑक्टोबर, बुध | 1ली टी-20 | मनुका ओव्हल, कॅनबेरा | दुपारी 1:45 | ||
31 ऑक्टोबर, शुक्र | 2री टी-20 | मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न | दुपारी 1:45 | ||
2 नोव्हेंबर, रवि | 3री टी-20 | बेलरिव्ह ओव्हल, होबार्ट | दुपारी 1:45 | ||
6 नोव्हेंबर, गुरु | 4थी टी-20 | बिल पिपेन ओव्हल, गोल्ड कोस्ट | दुपारी 1:45 | ||
8 नोव्हेंबर, शनि | 5वी टी-20 | द गाबा, ब्रिस्बेन | दुपारी 1:45 |
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असली तरी अद्याप ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झालेला नाही. गिलच्या नेतृत्वाखाली या दौऱ्यात टीम इंडियाला मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. गिलने इंग्लंड दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते आणि मालिका बरोबरीत सोडवली होती. आता मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची ऑस्ट्रेलियात खरी कसोटी लागणार आहे.
भारताचा वनडे संघ-
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल.
भारताचा टी-20 संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर.