केएल राहुलला शतक केल्यानंतर त्याचं सेलिब्रेशनही करता आलं नाही. शतक केल्यानंतर राहुलने बॅट वर केली आणि त्यानंतर लगेचच तो मैदानातून ड्रेसिंग रूमच्या दिशेने पळाला. हेल्मेट आणि बॅट मैदानातच ठेवून राहुल ड्रेसिंग रूममध्ये गेला. बॅटिंग सुरू असताना राहुलला नेमकं काय झालं? हे समजू शकलं नसलं, तरी तो वॉशरूमसाठी ड्रेसिंग रूमला गेल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर अंपायरनी लगेचच ड्रिंक्स ब्रेक घेतला.
advertisement
केएल राहुलचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 9 वे शतक होतं. राहुलची 9 पैकी 8 शतकं ही परदेशामध्ये केलेली आहेत. राहुलच्या पाठोपाठ ऋषभ पंतनेही त्याचं शतक पूर्ण केलं. एकाच टेस्ट मॅचमध्ये दोन शतकं करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर झाला आहे. एकाच टेस्टमध्ये दोन शतकं करणारा पंत पहिला भारतीय विकेट कीपर तर जगभरातला दुसरा विकेट कीपर ठरला आहे.
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या शतकानंतरही टीम इंडियाचा 364 रनवर ऑल आऊट झाला. 31 रनमध्येच टीम इंडियाने त्यांच्या शेवटच्या 6 विकेट गमावल्या. करुण नायर 20 रनवर माघारी परतला, यानंतर भारताची बॅटिंग गडगडली. शार्दुल ठाकूर 4 रनवर आऊट झाला, तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा शून्य रनवर आऊट झाले. याआधी पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडियाच्या 7 विकेट 41 रनमध्येच गेल्या होत्या.