मॅचेस्टर सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारताना रिषभ पंतच्या पायाला बॉल लागला होता.यामुळे रिषभ पंतच्या पायाला सूज आली होती आणि रक्त देखील वाहत होते.या दरम्यान पंतने मैदानात चालण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चालताना प्रचंड त्रास होत होता.तसेच तो वेदनेने व्हिवळत होता.त्याला आपल्या पायावर उभंही राहता येत नव्हते.त्यामुळे मैदानात अॅम्ब्यूलन्स मागलवून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी केलेला तपासणीत त्याच्या उजव्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला तब्बल सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला होता.
advertisement
रिषभ पंतला दुखापत झाल्यानंतर त्याला रिटायर्ड आऊट देण्यात आलं होत. त्यावेळी रिषभ पंत 48 बॉलमध्ये 37 धावांवर खेळत होता. आता या दुखापतीनंतर तो मैदानात उतरेल की नाही? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण त्याच्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. रिषभ पंत दुसऱ्या दिवशी खेळाला सुरूवात झाल्यानंतर मैदानात पोहोचला आहे. तसेच तो संघाला गरज असले तर तो नक्कीच मैदानात फलंदाजीला उतरेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर टीम इंडियाच्या फिल्डींग दरम्या ध्रुव जुरेल विकेटकिपिंग करणार आहे.
रविंद्र जडेला स्वस्तात बाद
लॉर्डसच्या मैदानात इंग्लिश खेळाडूंच्या नाकात दम आणणारा रविंद्र जडेला मॅचेस्टर टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. कारण रविंद्र जडेजा 20 धावांवर बाद झाला आहे. सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सर खेळताना बॅटीला कड लागून विकेटमागे त्याची विकेट पजली होती. जडेजाची विकेट पडल्यानंतर आता वॉशिग्टन सुंदर फलंदाजीला आला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पहिल्या डावात किती धावांपर्यंत मजल मारतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर