इंग्लंडचे माजी क्रिकेटर डेविड लॉयडने रिषभ पंतच्या दुखापतीवर वादग्रस्त विधान केलं आहे. पंतच्या दुखापतीबद्दल अतिशयोक्ती केली जात आहे.ही दुखापत तितकी गंभीर नाही.रिषभ पंत दुखापतीचं नाटक करतो,असे विधान लॉयड यांनी केली आहे. त्यामुळे डेविड लॉयड यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे.
टॉक स्पोर्टशी बोलताना डेविड लॉयड यांनी रिषभ पंतच्या दुखापतीवर वादग्रस्त विधान केलं होतं. माझ्या पायाला कधीही मेटाटार्सल दुखापत झाली नाही, जी कदाचित पायाच्या काही भागात झालेली स्थिती असेल. अँडी रॉबर्ट्सविरुद्ध माझा हात मोडला आणि एकदा माझ्या गालाचे हाड मोडले, ज्यामुळे मी फलंदाजी करू शकलो नाही, जरी माझे बोट मोडल्यानंतर मी खेळत राहिलो, असे लॉयड यांनी सांगितले.
advertisement
लॉयड पुढे म्हणाले, पंत वेदनेत दिसत होता, त्याचे फलंदाजी परतणे खूप धाडसी होते, पण आज जेव्हा मी लाऊंजमध्ये होतो तेव्हा तिथल्या लोकांचे मत होते की तो दुखातपतीच नाटक करतोय.काही लोकांनी असेही म्हटले होते की त्याला वेळ द्यायला हवा होता, असे त्यांनी म्हटले.त्यामुळे डेव्हिड लॉईडच्या या विधानावरून असे स्पष्ट होते की इंग्लीश फॅन्स पंतच्या दुखापतीला नाटक समजतायत.
नियम बदलाची मागणी
सध्याच्या क्रिकेट नियमात जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर दुसरा खेळाडू त्याच्या मैदानात खेळू शकतो. पण त्याला बॅटींग करता येत नाही.त्यामुळे डेव्हिड लॉईड म्हणाले की जर पंतसारख्या खेळाडूला दुखापत झाली तर पर्यायी खेळाडूसाठी नियम असावा. मी धावपटूच्या बाजूने नाही, परंतु बाह्य दुखापतीसाठी त्याच खेळाडूची जागा घेण्याचा नियम असावा. हो,फिरकी गोलंदाजाने फलंदाजाची जागा घेऊ नये, असे देखील त्यांनी सांगितले.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर