मॅचेस्टर टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत अजिबात धार दिसत नाही आहे. बुमराहला विकेट काढण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता.त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये बुमराहला विकेट मिळाली नव्हती.त्यानंतर चौथ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये बुमराहने इंग्लंडच्या डॉसनची विकेट घेतली होती.त्यामुळे बुमराहच्या खात्यात आता 2 विकेट झाल्या आहे.या दरम्यान जसप्रीत बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात 100 धावा दिल्या आहेत.त्यामुळे बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.
advertisement
दरम्यान याआधी बुमराहने 2024 मध्ये मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध 4 विकेट घेऊन 99 धावा दिल्या होत्या. त्यामुळे मॅचेस्टर आणि मेलबर्न टेस्ट वगळता त्याने कधीही कसोटी डावात 90 पेक्षा जास्त धावा दिलेल्या नाहीत.
बुमराहच्या कसोटी डावातील सर्वात महागडा आकडा
2/100* विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 2025
4/99 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 2024
1/88 विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, 2020
5/85 विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2018
3/84 विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2021
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 31 वर्षीय बुमराहची कामगिरी सर्वोत्तम राहिलेली नाही. त्याने पाच डावांमध्ये 26.8 च्या सरासरीने 13 बळी घेतले आहेत, त्यापैकी 7बळी मागील गोलंदाजांविरुद्ध (8-11) आले आहेत. इंग्लंडच्या टॉप सात फलंदाजांविरुद्ध, बुमराहची सरासरी 42 च्या वर गेली आहे.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर