India vs England 4th Test, Rishabh Pant : मॅचेस्टर टेस्ट सामन्यात अटीतटीची लढत सूरू आहे. त्यात मैदानात दुखापतग्रस्त झालेल्या रिषभ पंतची एंन्ट्री झाली आहे. देशाला गरज असल्या कारणाने तो वेदनेत असतानाही मैदानात आला आहे. यावेळी त्याच्या एका पायात प्लास्टर आणि दुसऱ्या पायात चप्पल घातली आहे. या अवस्थेत तो मैदानात लंगडत लंगडत आला आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
खरं तर चौथ्या दिवसाच्या अखेरच रिषभ पंत दुसऱ्या डावातही फलंदाजीला उतरेल,अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला होता. पण शुभमन गिल बाद झाल्यानंतर तो मैदानात उतरला नव्हता.त्यामुळे तो कदाचित उशीरा मैदानात येईल असे वाटत होते. या दरम्यानचा आता रिषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओत रिषभ पंत लंगडत लंगडत मैदानात येताना दिसतो आहे.
रिषभ पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या अवस्थेतही त्याने चौथ्या टेस्टच्या पहिल्या डावात फलंदाजी केली होती. आणि दुसऱ्या डावातही फलंदाजी उतरणार आहे. कारण टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी त्याच्याकडून जितकं होऊ शकलं तितकी इंग्लंडला कडवी झूंज दिली. त्यामुळे आता टीम इंडियाला अनुभवी रिषभ पंतची गरज आहे,यासाठीच तो मैदानात परतला आहे.
रिषभ पंतच्या एका पायाला प्लास्टर आहे, तर दुसऱ्या पायात चप्पल आहे. तसेच तो एका व्यक्तीचा आधार घेऊन लंगडत मैदानात येताना दिसतो आहे. या दरम्यान त्याला वेदना प्रचंड होत आहेत. पण या वेदना लपवून तो मैदानात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कॉन्फिडेन्स कमालीचा वाढला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंच टेन्शन वाढलं आहे.
सध्या रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर दोघेही मैदानात टीचून फलंदाजी करतायत. टीम इंडियावर अजून 22 धावांची आघाडी आहे. ही आघाडी पुर्ण केल्यानतंर टीम इंडियाला इंग्लंडसमोर मोठं लक्ष्य ठेवायचं आहे.या दरम्यान आता रिषभ पंत मैदानात कधी उतरणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर