'मी जसप्रीत बुमराहचं नेहमीच कौतुक करतो, त्याच्या फास्ट बॉलिंगच्या कलेवर मला प्रेम आहे. तो उत्कृष्ट बॉलर आहे, पण जर तुम्हाला भारताकडून खेळायचं असेल तर तुम्हाला सर्वस्व द्यावं लागेल. तुम्ही 5 ओव्हरचा स्पेल टाकला आणि रूट बॅटिंगला आला तेव्हा सहावी ओव्हर टाकली नाही, हे योग्य नाही. तुम्ही एकतर तुमचं सर्वस्व द्या, नाहीतर आराम करा', असं इरफान पठाण त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला आहे.
advertisement
'देश आणि टीम सगळ्यात पहिले, बुमराहने प्रयत्न केले नाहीत, असं कुणीही म्हणू शकत नाही. त्याने बॉलिंग केली आहे, पण तुम्ही टीमसाठी जास्त मेहनत केली पाहिजे. जर त्याने टीम इंडियाला सातत्याने मॅच जिंकवून दिल्या, तर तो टॉपवर राहिल. टीमला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही आणखी मेहनत केली पाहिजे. बेन स्टोक्सने तेच केलं. 4 वर्षांनी कमबॅक करणाऱ्या जोफ्रा आर्चरनेही असाच खेळ दाखवला', असं वक्तव्य इरफान पठाणने केलं.
मॅनचेस्टरमध्ये करो या मरो
लीड्समध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह खेळला होता आणि त्याने एका इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतर बुमराह दुसरी टेस्ट खेळला नाही. लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराहने कमबॅक केलं आणि पहिल्या इनिंगमध्ये 5 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट घेतल्या. आता मॅनचेस्टर टेस्ट टीम इंडियासाठी करो या मरो आहे, कारण भारतीय टीम सीरिजमध्ये 2-1 ने पिछाडीवर आहे. चौथ्या टेस्टमध्ये पराभव झाला तर टीम इंडियावर सीरिज गमावण्याची नामुष्की ओढावेल.