मॅचेस्टर सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारताना रिषभ पंतच्या पायाला बॉल लागला होता.यामुळे रिषभ पंतच्या पायाला सूज आली होती आणि रक्त देखील वाहिले होते.त्याला आपल्या पायावर उभंही राहता येत नव्हते.त्यामुळे मैदानात अॅम्ब्यूलन्स मागलवून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची मााहिती दिली होती. तसेच त्याला सहा आठवड्यासाठी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता.यावेळी रिषभ पंत 47 बॉलमध्ये 37 धावा करून रिटायर्ड आऊट झाला होता.
advertisement
रिषभ पंतची दुखापत पाहता तो मैदानात उतरेल याची शक्यता फार कमीच होती. पण संघाची गरज लक्षात घेऊन तो मैदानात उतरला होता. यावेळी मॅचेस्टरच्या सर्व प्रेक्षकांनी उभं राहुन टाळ्या वाजवून त्याचं मैदानात स्वागत केलं होतं. या स्वागतानंतर त्याने आपली लढाऊवृत्ती दाखवत 67 बॉलमध्ये आपलं 53 अर्धशतक पुर्ण केलं होत. या शतकानंतर एक धावा करून 54 धावांवर तो आऊट झाला होता.विशेष म्हणजे दुखापतीनंतर तो 27 बॉल खेळला होता.
रिषभ पंत जितक्या लढाऊवृत्तीने खेळला तितक्याच लढाऊवृत्तीने त्याची विकेट पडली आहे. जोफ्राने टाकलेल्या बॉलमुळे स्टम्प उघडून उंचावर उडाला होता. दरम्यान पंतनंतर टीम इंडियाचे बॉलर्स फारशी काही कामगिरी करू शकले नाही आणि टीम इंडियाचा डाव 358 धावांवर ऑल आऊट झाला.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर