मॅचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव हा 358 धावांवर ऑल आऊट झाला होता. यावेळी दुखापतग्रस्त रिषभ पंतने झुंजार खेळी केली होती. रिषभ पंत लगडत लगडत खेळला पण त्याने इंग्लंडला कडवी झूंज दिली. या दरम्यान त्याने अर्धशतक ठोकलं आहे. या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने 358 धावांपर्यंत मजल मारली होती. पंतच्या याच खेळीवर आता संजीव गोयंका फिदा झाले आहे.
advertisement
संजीव गोयंका यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रिषभ पंत नुसत टॅलेंट नाही तर तो एक कॅरेक्टर आहे, सलाम, अशा शब्दात संजीव गोयंका यांनी रिषभ पंतच्या खेळीचे कौतुक केले आहे. संजीव गोयंका यांच्या या रिअॅक्शनची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
पंत बनला टेस्टचा सिक्सर किंग
या सिक्सनंतर आता रिषभ पंत टेस्टमधला सिक्सर किंग बनला आहे. कारण रिषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये 90 सिक्स ठोकले होते. त्याच्याबरोबर विरेंद्र सेहवागने देखील तितकेच 90 सिक्स ठोकले होते. यानंतर रोहित शर्माच्या नावावर टेस्टमध्ये 88 सिक्स आहेत. रोहितनंतर एमएस धोनीच्या नावावर 78 सिक्स आहेत. धोनीनंतर रविंद्र जडेजाच्या नावावर 74 सिक्स आहेत.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार
रिषभ पंत : 90
वीरेंद्र सेहवाग :90
रोहित शर्मा : 88
एमएस धोनी : 78
रवींद्र जडेजा : 74
तसेच इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला विकेटकिपर ठरला आहे. रिषभ पंतने इंग्लंड विरूद्ध चालु मालिकेत 479 धावा केल्या होत्या.या आतापर्यंत एका विकेट किपरने इंग्लंड विरूद्ध ठोकलेल्या सर्वाधिक धावा आहेत.त्याच्यानंतर अॅलेक स्टीवर्टने एका मालिकेत 464 धावा केल्या आहेत. आणि जेमी स्मिथने याच मालिकेत भारताविरूद्ध 415 धावा केल्या आहेत. स्मिथ पंतच्या फारसा दुर नाही आहे. जॉनी बेअरस्ट्रोने श्रीलंकेविरूद्ध एका मालिकेत 387 धावा केल्या आहेत.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर