पंत 1000 धावा करणारा सहावा खेळाडू
इंग्लंडच्या मैदानावर 1000 धावा पूर्ण करणारा रिषभ पंत हा सहावा खेळाडू ठरला आहे.याआधीच याच सामन्यात केएल राहुलने 1000 धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे तो 1000 धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला होता. तर सर्वांधिक धावा ठोकण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये 1575 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये 1376 धावा केल्या आहेत. यानंतर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांचा नंबर लागतो, त्यांनी इंग्लंडमध्ये 1152 धावा केल्या आहेत. गावस्कर यांच्यानंतर विराट कोहलीचा चौथ्या स्थानी नंबर लागतो.विराट कोहलीने इंग्लंडमध्ये 1096 धावा केल्या आहे.
advertisement
ईसपीएल क्रिकईन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या भूमिवर टेस्ट क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा रिषभ पंत हा पहिला विकेटकिपर ठरला आहे. तर याआधी इतर पाहुण्या विकेटकिपरने 800 पेक्षा जास्त धावा केल्या नाही आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील 778 धावा केल्या आहेत.त्यामुळे इंग्लंडमध्ये 1000 धावा करणारा रिषभ पंत हा पहिला विकेटकिपर ठरला आहे.
पंत रिटायर्ड आऊट का झाला?
चांगल्या लयीत खेळत असताना रिषभ पंत रिटायर्ड आऊट झाला आहे.त्याचं झालं असं की क्रिस वोक्सने टाकलेल्या बॉलवर स्विप मारायला गेलेल्या रिषभ पंतच्या पायावर जाऊल बॉल आदळता होता.पण सूदैवाने बॉल बॅटीला लागल्याने अंपायरने त्याला नॉटआऊट दिले होते.यामुळे रिषभ पंतची विकेट तर वाचली होती पण त्याच्या पायाची विचित्र हालत झाली होती.
रिषभ पंतच्या उजव्या पायावर मोठी सूज आली होती. आणि त्यातून थोडे रक्तही वाहत होते.तसेच त्याला पायावर उभंही राहता येत नव्हते. त्यामुळे त्याला रिटायर्ड आऊट देण्यात आलं होतं. त्यानंतर मैदानात आलेल्या गाडीने त्याला उपचारासाठी नेण्यात आलं होतं.ज्यावेळेस तो गाडीने जात होता त्यावेळेस त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे पंतला झालेली दुखापत टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.
रिषभ पंत 37 धावांवर खेळत होता तेव्हा तो रिटायर्ड आऊट झाला होता.आता त्याच्या जागी रविंद्र जडेजा फलंदाजीला आला आहे. टीम इंडियाने 235 धावांवर 4 विकेट गमावल्या आहेत.साई सुदर्शन 61 धावांवर बाद झाला आहे.