टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधला टीम इंडियाचा हा सगळ्यात कमी रननी झालेला विजय आहे. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराजने 5 विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाला 4 आणि आकाश दीपला 1 विकेट घेण्यात यश आलं. या विजयासोबतच टीम इंडियाने 5 टेस्ट मॅचची सीरिज 2-2 ने बरोबरीमध्ये सोडवली आहे.
advertisement
इरफानची पोस्ट, विराटवर निशाणा
टीम इंडियाच्या या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. इरफानच्या या पोस्टवरून चाहते त्याने विराट कोहलीवर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. 'या सीरिजने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, क्रिकेट कुणासाठीही थांबत नाही', असं इरफान पठाण म्हणाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजआधी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. इरफानने यावरूनच विराटवर निशाणा साधल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
कॉमेंट्री बॉक्समधून पठाणची हकालपट्टी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीवेळीही इरफान पठाणने विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती, त्यानंतर आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून इरफान पठाणची हकालपट्टी केली गेली. विराटवर टीका केल्यामुळे इरफानला कॉमेंट्री बॉक्समधून डच्चू मिळाल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.
काय म्हणाला होता इरफान?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवेळी इरफान पठाणने विराटच्या कामगिरीवर टीका केली होती. विराट कोहलीने घरगुती क्रिकेटमध्ये शेवटचा सामना एक दशकापुर्वी खेळला होता. त्यामुळे असे खेळाडू संघात हवेत का? याचा आता विचार करायला हवा. एखाद्या युवा खेळाडूला संधी दिल्यास तो देखील 25-30ची सरासरी देऊ शकतो,असे मत त्याने काँमेंट्री करताना मांडले होते.