इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून केएल राहुल सर्वाधिक झेल घेणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ऑली पोपचा घेतलेला झेल इंग्लंडविरुद्धचा त्याचा 26 वा झेल होता. या बाबतीत त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 25 झेल घेतले आहेत. तथापि, सुनील गावस्कर या यादीत अव्वल स्थानावर आहेत, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून 35 झेल घेतले आहेत.
advertisement
इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक कॅच घेणारे भारतीय खेळाडू
सुनील गावस्कर : 35 कॅच
राहुल द्रविड : 30 कॅच
केएल राहुल : 26 कॅच
विराट कोहली : 25 कॅच
दरम्यान 33 वर्षीय केएल राहुलने 2014 मध्ये भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 62 सामने खेळले आहेत (2025 मध्ये इंग्लंडविरुद्धचा ओव्हल कसोटी वगळता), ज्यामध्ये त्याने 109 डावांमध्ये 3768 धावा केल्या आहेत. राहुलने कसोटी स्वरूपात 10 शतके आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याने टीम इंडियासाठी 85 एकदिवसीय आणि 72 टी-20 सामने देखील खेळले आहेत.
पाचव्या टेस्टसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.
पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग आणि ख्रिस वोक्स.