बुमराह खेळणार का नाही?
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी, भारताचे बॅटिंग प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी जसप्रीत बुमराहबद्दल मोठी माहिती दिली आहे. सितांशू कोटक यांनी स्पष्ट केले आहे की बुमराह सध्या तंदुरुस्त आहे आणि त्याचा वर्कलोड संतुलित आहे. प्रशिक्षकांच्या मते, बुमराहने गेल्या सामन्यात एक इनिंग बॉलिंग केली होती आणि आता कर्णधार, प्रशिक्षक आणि फिजिओ त्याच्या उपलब्धतेबद्दल एकत्रितपणे निर्णय घेतील. पण, अद्याप यावर कोणतीही अंतिम चर्चा झालेली नाही.
advertisement
टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या महत्त्वाच्या सामन्यात बुमराहच्या सहभागाची शक्यता नाकारली नाही. मंगळवारी कोटक यांनी याचा पुनरुच्चार केला. मॅचच्या दोन दिवस आधी कोटक म्हणाले, 'बुमराह आता त्याच्या वर्कलोडनुसार तंदुरुस्त आहे. त्याने गेल्या सामन्यात एका इनिंगमध्ये बॉलिंग केली. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक, आमचे फिजिओ आणि कर्णधार चर्चा करून निर्णय घेतील. अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.' त्याच वेळी, गंभीरने ओल्ड ट्रॅफर्ड येथेच सर्व फास्ट बॉलर फिट आहेत, म्हणजेच अर्शदीप सिंग आणि आकाश दीप दुखापतींमधून बरे झाले आहेत, असं स्पष्ट केलं होतं.
सिराजच्या वर्कलोडचं काय?
मोहम्मद सिराजबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कोटक म्हणाले की सिराज संपूर्ण सीरिज खेळला असला, तरी त्याचा वर्कलोड संतुलित आहे. त्यांनी सांगितले की खेळाडूंच्या वर्कलोडचे निरीक्षण जीपीएस सिस्टमद्वारे केले जाते, जे दर आठवड्याला ओव्हरची संख्या आणि थकवा यांचे विश्लेषण करते. सिराजचा वर्कलोड आतापर्यंत ठीक आहे आणि कोणताही 'स्पाइक' आलेला नाही. कामाचा ताण हा केवळ सामन्यात टाकलेल्या ओव्हरशी संबंधित नाही तर तो संपूर्ण आठवड्याचा सराव आणि एकूण खेळाशी संबंधित आहे. सिराजला थकवा जाणवला तरच त्याला विश्रांती दिली जाईल. अन्यथा, तो खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.