इंग्लंड विरूद्ध एका टेस्ट सामन्यात रिषभ पंतच्या पायाला प्रचंड दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर देखील तो तुटलेल्या पायाने मैदानात उतरला होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्समुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता.या घटनेवर आता क्रिस वोक्सने माफी मागितली आहे.रिषभ पंत मला माफ कर. तुझ्या तुटलेल्या पायाबद्दल मी माफी मागतो,असे क्रिस वोक्स म्हणाला आहे.
advertisement
द गार्डियनशी बोलताना क्रिस वोक्सने रिषभ पंतसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. 'मी पाहिले की रिषभने इन्स्टाग्रामवर माझा एक फोटो सॅल्यूट इमोजीसह पोस्ट केला होता, म्हणून मी त्याचे आभार मानले. तसेच त्याने दाखवलेल्या कृतीचं मी अभिनंदन केले आणि त्याचा पाय ठीक असेल अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर त्याने (रिषभने) मला एक व्हॉइस नोट पाठवली ज्यामध्ये म्हटले,मला आशा आहे की सर्व काही ठीक आहे, बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि मला आशा आहे की आपण कधीतरी पुन्हा तिथे भेटू,असे त्याने मला सांगितले.यावेळी त्याच्या पाय फ्रॅक्चर झाल्याबद्दल त्याची माफी मागितली,असे क्रिस वोक्सने सांगितले.
दरम्यान मॅचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात ख्रिस वोक्सने टाकलेल्या बॉलवर रिषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.यावेळी त्याच्या पायातून रक्तही आले होते. त्यानंतर अॅम्ब्युलॅन्सच्या मदतीने त्याला मैदानातून थेट रूग्णालयात नेण्यात आले होते.रिषभ पंतला मेटाटार्सल दुखापत झाली होती. या दुखापतीनंतही भारताला गरज असताना तो मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. या दरम्यान त्याने टीम इंडियासाठी अर्धशतकीय खेळी केली होती. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला होता.