चौथ्या टेस्टमध्ये पंत पेन किलर घेऊन बॅटिंग करू शकतो का? याबाबत मेडिकल टीम प्रयत्न करत आहे, पण याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
ऋषभ पंतला दुखापत झाल्यामुळे निवड समितीने इशान किशनला पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियात सामील करून घ्यायचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपासून ओव्हलमध्ये पाचव्या टेस्टला सुरूवात होणार आहे. टीम इंडियाकडे आधीच ध्रुव जुरेल बॅकअप विकेट कीपर म्हणून आहे. चौथ्या टेस्टमध्ये पंतच्या गैरहजेरीत ध्रुव जुरेलच विकेट कीपिंग करणार आहे. याआधी तिसऱ्या टेस्टवेळीही पंतला दुखापत झाली होती, तेव्हा जुरेलनेच विकेट कीपिंग केली होती.
advertisement
इंग्लंड दौऱ्यात दुखापत झालेला ऋषभ पंत हा टीम इंडियाचा चौथा खेळाडू आहे. याआधी नितीश कुमार रेड्डीही दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे. तर आकाश दीपही दुखापतीमुळे चौथ्या टेस्टमध्ये खेळत नाहीये. डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग यालाही दुखापत झाली आहे.
इशान किशनने 2023 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, जिकडे त्याने अर्धशतक केलं. वेस्ट इंडिज सीरिजमधल्या दोन्ही टेस्ट इशान किशन खेळला होता, ज्यात भारताचा 1-0 ने विजय झाला. यानंतर 27 वर्षांच्या इशान किशनने मानसिक थकव्यामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला, त्यानंतर बीसीसीआयने इशान किशनला वार्षिक करारातून वगळलं, कारण तो झारखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला नाही. इशान किशन भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 साली टी-20 सीरिजदरम्यान खेळला होता.