मांजरेकर यांनी लीड्स कसोटी सामन्यात जडेजाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली आणि त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली.मांजरेकर म्हणाले प्रसिद्ध कृष्णासारख्या तरुण गोलंदाजांना लक्ष्य करणे योग्य नाही. ते म्हणाले की जडेजा सामन्याच्या शेवटच्या दिवशी खेळपट्टीचा फायदा घेऊ शकला असता, परंतु इतका अनुभव असूनही तो चमत्कार करू शकला नाही,असा हल्ला त्यांनी जडेजावर चढवला.
advertisement
संजय मांजरेकर यांनी जिओ हॉटस्टारवर सांगितले,'प्रसिद्ध कृष्णासारख्या तरुण खेळाडूंवर जास्त टीका करणे योग्य नाही. त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता स्पष्ट आहे. परंतु मी रवींद्र जडेजावर टीका करेन. तो सामन्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यासाठी खेळपट्टीवर काही कठीण परिस्थिती होती, ज्याचा तो फायदा घेऊ शकला असता.अशा अनुभवी खेळाडूकडून आम्हाला अधिक अपेक्षा आहेत.
'जेव्हा तुम्ही अनुभवी गोलंदाज आणि फलंदाजांसोबत काम करत असता तेव्हा त्यांच्याकडून उच्च पातळीची धोरणात्मक समज अपेक्षित असते. कुठेतरी मला असे वाटले की जडेजाने निराशा केली. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून कोणतीही मदत मिळत नसली तरी, या खेळपट्टीत जडेजासाठी काहीतरी होते. पण तरीही तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही, अशा शब्दात मांजरेकर यांनी जडेजाला सुनावलं.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर,
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल,साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईसवरन, मोहम्मद जयस्वार, मोहम्मद जयस्वार, प्रसिध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव,हर्षित राणा
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: 31 जुलै 4 ऑगस्ट 2025 द ओव्हल, लंडन