TRENDING:

टॉस पडताच लागला IND vs PAK मॅचचा निकाल, पाकिस्तानचा पायावर धोंडा, टीम इंडियाचा विजय फिक्स!

Last Updated:

आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही आपण टॉस जिंकला असता तर पहिले बॉलिंग घेतली असती, कारण रात्री दुबईमध्ये दव पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे बॉल बॅटवर चांगला येईल, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
टॉस पडताच लागला IND vs PAK मॅचचा निकाल, पाकिस्तानचा पायावर धोंडा, टीम इंडियाचा विजय फिक्स!
टॉस पडताच लागला IND vs PAK मॅचचा निकाल, पाकिस्तानचा पायावर धोंडा, टीम इंडियाचा विजय फिक्स!
advertisement

टॉसच ठरणार बॉस

दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 मॅच झाल्या आहेत, या तीनही सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीम जिंकल्या आहेत. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुबईमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला होता. तर 2022 च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेटने पराभव केला, यानंतर पुढच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेटने धूळ चारली. या सामन्यांचं रेकॉर्ड पाहिलं तर तीनही सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा पराभव झाला आहे.

advertisement

दुबईमध्ये चेस करणं सोपं

दुबईच्या मैदानामध्ये आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जातं, असा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. दुबईची खेळपट्टी सुरूवातीला धीमी असते, त्यामुळे बॉल थांबून येतो आणि बॅटरला शॉट खेळणं कठीण जातं. जशी रात्र होत जाते, तसं दुबईतलं वातावरण थंड होत जातं, ज्यामुळे खेळपट्टी जलद होत जाते आणि त्यामुळे बॉल बॅटवर चांगल्या पद्धतीने येतो आणि शॉट खेळणं सोपं होतं.

advertisement

टीम इंडियात कोणताही बदल नाही

आशिया कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा दारूण पराभव केला होता. यानंतर आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय टीममध्ये कोणताही बदल झालेला नाही. या सामन्यात टीम इंडिया 3 स्पिनर घेऊन खेळत आहे.

भारतीय टीम

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

advertisement

पाकिस्तानची टीम

साहिबझादा फरहान, सॅम अयुब, मोहम्मद हॅरिस, फखर झमान, सलमान आघा, हसन नवाझ, मोहम्मद नवाझ, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टॉस पडताच लागला IND vs PAK मॅचचा निकाल, पाकिस्तानचा पायावर धोंडा, टीम इंडियाचा विजय फिक्स!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल