TRENDING:

IND vs PAK : 14 सप्टेंबर पाकिस्तान कधीच विसरणार नाही, क्रिकेटच्या मैदानात भारताने दिली भळभळती जखम

Last Updated:

भारतीय क्रिकेटसाठी 14 सप्टेंबर हा दिवस खूपच खास आहे, कारण याच दिवशी भारताने पाकिस्तानला भळभळती जखम दिली होती. पाकिस्तानसाठी 14 सप्टेंबर हा दिवस वाईट स्वप्नासारखाच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात आज म्हणजेच 14 सप्टेंबर 2025 ला आशिया कपमध्ये मॅच होणार आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, अशी मागणी अनेक भारतीयांनी केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी दुबईच्या मैदानात उतरणार आहे. भारतीय क्रिकेटसाठी 14 सप्टेंबर हा दिवस खूपच खास आहे, कारण याच दिवशी भारताने पाकिस्तानला भळभळती जखम दिली होती. पाकिस्तानसाठी 14 सप्टेंबर हा दिवस वाईट स्वप्नासारखाच आहे.
14 सप्टेंबर पाकिस्तान कधीच विसरणार नाही, क्रिकेटच्या मैदानात भारताने दिली भळभळती जखम
14 सप्टेंबर पाकिस्तान कधीच विसरणार नाही, क्रिकेटच्या मैदानात भारताने दिली भळभळती जखम
advertisement

14 सप्टेंबर पाकिस्तानची झोप उडाली

क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान हे सगळ्यात जुने कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावामुळे दोन्ही देश फक्त आशिया कप आणि टी-20 स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने येत नाहीयेत. याच तारखेला दोन्ही देशांमध्ये 2007 टी-20 वर्ल्ड कपचा सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, पण भारताने ही मॅच रन किंवा विकेटने नाही तर बॉल आऊटने जिंकली होती.

advertisement

टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजची मॅच खेळवली गेली. या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 141 रन केले, त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 142 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 7 विकेट गमावून 141 रनच केले, त्यामुळे कोणतीच टीम जिंकली नाही.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली, त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार टाय झालेल्या मॅचचा निर्णय बॉल आऊटने निश्चित केला गेला. ज्यात भारतीय बॉलरनी पहिल्या तीनही बॉलवर स्टंप उडवले, पण पाकिस्तानच्या एकाही बॉलरना स्टंप उडवता आले नाहीत, त्यामुळे हा सामना भारताने जिंकला. टीम इंडियासाठी हा विजय महत्त्वाचा होता, कारण पुढे जाऊन टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताने पाकिस्तानला धूळ चारली, त्यामुळे भारत पहिल्याच टी-20 वर्ल्ड कपमध्ये विश्वविजेता बनला. दुसरीकडे आयसीसीने बॉलआऊटचा हा नियम नंतर बदलला. मॅच टाय झाली तर दोन्ही टीममध्ये एक-एक ओव्हरची सुपर ओव्हर खेळवण्याचा नियम आयसीसीने बनवला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 14 सप्टेंबर पाकिस्तान कधीच विसरणार नाही, क्रिकेटच्या मैदानात भारताने दिली भळभळती जखम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल