पहिल्या टी-20 मध्ये तुटली 5 रेकॉर्ड
बुमराहचं शतक : जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 विकेट घेणारा बुमराह दुसरा भारतीय बॉलर बनला आहे. 78 इनिंगमध्येच बुमराहने हे रेकॉर्ड केलं आहे. याआधी अर्शदीप सिंग टी-20 मध्ये 100 विकेट घेणारा भारताचा पहिला बॉलर ठरला होता.
advertisement
कीपरच्या सर्वाधिक विकेट
एका टी-20 सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या विकेट कीपरच्या यादीत जितेश शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात जितेशने 4 विकेट घेतल्या. याआधी एमएस धोनीने चार वेळा एकाच सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या.
टी-20 मध्ये 100 सिक्स
हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 सिक्स मारणारा चौथा भारतीय बनला आहे. याआधी रोहित शर्मा (205) सूर्यकुमार यादव (155) आणि विराट कोहली (124) यांनी 100 सिक्सचा टप्पा ओलांडला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा मोठा विजय
कटकमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 101 रननी पराभव केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा तिसरा सगळ्यात मोठा विजय आहे. तर भारताचा घरच्या मैदानातला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे.
तिलक वर्माच्या हजार रन
तिलक वर्मा 25 वर्षांच्या वयात एक हजार आंतरराष्ट्रीय टी-20 रन करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तिलकने 23 वर्ष आणि 31 दिवसांचा असतानाच हा विक्रम केला आहे.
