मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशातच आता लखनऊप्रमाणे इथंही सामना रद्द होणार का? असा सवाल विचारला जातोय. अहमदाबादमध्ये देखील AQI जास्त आहे का? जाणून घ्या.
advertisement
हवेच्या गुणवत्तेबाबत बोलायचे झाले तर, हार्दिक पांड्याला मास्क लावून सराव करताना पाहिल्यावर चाहत्यांच्या चिंतेत भर पडली होती. लखनऊमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 490 च्या वर पोहोचला होता, जो अत्यंत घातक मानला जातो.
अहमदाबादमध्ये सध्या ही पातळी 174 च्या आसपास असून ती 'अस्वस्थ' श्रेणीत मोडते. तरीही, सुदैवाने इथली परिस्थिती लखनऊच्या तुलनेत बरी असल्याने व्हिजिबिलिटीवर त्याचा मोठा परिणाम होणार नाही.
दरम्यान, सामना होणार असल्याची परिस्थिती असताना दुसरीकडे खेळाडूंच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत असल्याचं पहायला मिळतंय. साडेतीन तास खेळाडूंना याच प्रदुषित हवेखाली खेळावं लागतंय. त्यामुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
