BCCI ने आपल्या अधिकृत अकाऊंटवर लिहिलं की, "3 वार, 0 प्रतिसाद. आशिया कप चॅम्पियन. संदेश मिळाला आहे. संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी ₹२१ कोटींची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे."
रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुबईतील दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप फायनलमध्ये भारताने ५ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघाला जिंकण्यासाठी १४७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे त्यांनी २ चेंडू शिल्लक असताना साध्य केले. तिलक वर्माने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माला सामनावीर आणि अभिषेक शर्माला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
या अंतिम सामन्यात पाकिस्तानचे ओपनर बॅट्समन साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ९.४ षटकांत ८४ धावांची मोठी भागीदारी केली. तथापि, ही भागीदारी तुटल्यानंतर, पाकिस्तानी संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. पूर्ण २० षटकंही खेळू शकला नाही. भारताकडून कुलदीप यादवने चार, तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
