सूर्यकुमारने गनिमी काव्याचा वापर केला अन...
सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी अखेरपर्यंत टिकून सामना खिशात घातला. त्यानंतर दोघांना एकमेकांना हँडशेक केलं अन् थेट ड्रेसिंग रुमची वाट धडली. सूर्यकुमार गनिमी काव्याचा वापर केला अन् पाकिस्तानला धडा शिकवला. टीम इंडियाने हँडशेक केलं नाही. टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले अन् दरवाजा लावून घेतला. तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू टाटकळत उभे राहिले होते. मात्र, हँडशेक न केल्याने टीम इंडियावर दंड ठोठावला जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. या संदर्भात काही आयसीसीचा नियम आहे का? जाणून घ्या.
advertisement
आयसीसीचा काही नियम आहे का?
आयसीसीच्या कोणत्याही क्रिकेट नियम पुस्तकात असं कुठंही लिहिलेलं नाही की सामन्यानंतर हस्तांदोलन करणं अनिवार्य आहे. हस्तांदोलन हा नियम नाही पण तो क्रिकेटच्या भावनेचा एक भाग मानला जातो. यामुळेच दोन्ही संघांचे खेळाडू जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर एकमेकांना भेटतात. खेळाडूंमधील रोष दूर होतो पण हँडशेक करणं हा नियम नाही. हँडशेक हा नियम नसल्याने टीम इंडियाला दंड ठोठावला जाणार नाही.
भारतीयांच्या भावनेचा आदर
दरम्यान, बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. या भारतीयांच्या भावनेचा आदर टीम इंडियाच्या खेळाडूंनी ठेवला. दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला. तसेच विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं.