23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीची वाट सर्व क्रिकेट चाहते पाहत आहेत. भारत-पाकिस्तान लढतीची ही क्रेझ आज नव्हे तर अनेक दशकांपासून सुरू आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानची ही क्रिकेट Rivalryचा इतिहासात आज जाणून घेऊयात दोन्ही देशातील पहिली लढत कधी झाली होती आणि या लढतीचा निकाल काय होता?
प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला, जिंकला खो खो वर्ल्डकप
advertisement
ब्रिटीशांनी देश सोडताना भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी केली. 1947 मध्ये दोन नव्या देशांची निर्मिती झाली खरी पण त्यांच्यातील पहिल्या क्रिकेट सामन्यासाठी 1952 साला उजडावे लागले. दोन्ही देशातील पहिली मॅच ही कसोटी फॉर्मेटमधील होती.
16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झाली. या सामन्यात भारताचे कर्णधार लाला अमरनाथ तर पाकिस्तान संघाचे कर्णधार अब्दुल कारदार होते. लाल अमरनाथ यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने पहिल्या डावात 372 धावा केल्या. भारताकडून हेमू अधिकारी यांनी नाबाद 81, विजय हजार यांनी 76 तर विजय मांजरेकर यांनी 23 धावांचे योगदान दिले.
Cricket: भारताच्या पोरींचा T-20 वर्ल्डकपमध्ये धमाका, फक्त 26 चेंडूत संपवली मॅच
भारताच्या 372 धावांच्या उत्तरादाखल पाकिस्तानचा डाव फक्त 150 धावांत संपुष्ठात आला आणि भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पाकवर फॉलोऑनची नामुष्की आली. दुसऱ्या डावात देखील पाकिस्तानचा डाव गडगडला आणि ते फक्त 152 धावा करून बाद झाला. या ऐतिहासिक कसोटीत भारताने एक डाव आणि ७० धावांनी विजय मिळवला.
या कसोटीत पाकिस्तानची दाणादाण उडवली होती ती भारताचे गोलंदाज वीनू मांकड यांनी होय. मांकड यांनी पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या.
या दौऱ्यात दोन्ही संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. ज्यातील पहिली कसोटी भारताने तर दुसरी कसोटी पाकिस्तानने जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यानंतर मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने पाकिस्तानचा 10 विकेटनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील चौथी आणि पाचवी कसोटी ड्रॉ झाली. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.