भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी मॅच 1952 झाली झाली होती. या दोन्ही संघातील पहिल्या वनडे मॅचसाठी 1978 सालापर्यंत वाट पहावी लागली. या दोन्ही संघात 1 ऑक्टोबर 1978 रोजी पहिली वनडे झाली. भारतीय संघ 1978/79 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. ही मॅच पाकिस्तानच्या क्वेटा शहरात झाली होती. सध्या दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नसले तरी तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. दोन्ही देशात दोन युद्ध झाली होती आणि पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती.
advertisement
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
IND vs PAKच्या पहिल्या वनडेत भारताचे नेतृत्व बिशन सिंह बेदी यांच्याकडे होते. या सामन्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पाकिस्तानविरुद्ध भारताकडून तिघा दिग्गज खेळाडूंनी पदार्पण केले होते. हे 3 खेळाडू म्हणजे कपिल देव, चेतन चौहान आणि सुरेंद्र अमरनाथ होय.
भारताचे कर्णधार बेदी यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 40 षटकात 7 बाद 170 धावा केल्या. ज्यात मोहिंदर अमरनाथ यांच्या 51 तर दिलीप वेंगसरकर यांच्या 34 धावांचे योगदान होते. भारताने दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 40 षटकात 8 बाद 166 धावा करता आल्या. भारताने ही चुरशीची लढत 4 धावांनी जिंकली.
वैष्णवीची हॅट्ट्रिक! वर्ल्डकपमध्ये भारताने फक्त 17 चेंडूत केला यजमानांचा पराभव
आपल्या पहिल्या वनडे सामन्यात कपिल देव यांनी 8 ओव्हरमध्ये 27 धावा देत एक विकेट घेतली होती. 51 धावा आणि 2 विकेट घेणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्कार मिळाला होता. दोन्ही संघातील पहिल्या कसोटीत सामन्यात देखील भारताने विजय मिळवला होता आणि वनडे देखील टीम इंडियाने बाजी मारली.
या दौऱ्यात दोन्ही संघात प्रत्येकी 3 वनडे आणि कसोटी मॅच झाली होती. या दोन्ही मालिका पाकिस्तानने जिंकल्या होत्या. वनडे मालिकेतील तिसरी लढत भारताने पाकिस्तानला बहाल केली होती. ज्यामुळे त्यांनी वनडे मालिका जिंकली.