अश्विनचा पत्ता कट
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी अश्विनला 9.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण त्याची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2025 मध्ये, अश्विनने सीएसकेसाठी एकूण 9 सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त 7 विकेट घेऊ शकला. त्याच वेळी, त्याने बॅटिंगमध्येही फक्त 33 रन केल्या.
डेवॉन कॉनवेकडूनही निराशा
सीएसकेने लिलावामध्ये न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवेला 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण यंदाच्या मोसमात कॉनवेने सीएसकेला चांगली सुरूवात करून दिली नाही. आयपीएल 2025 मध्ये कॉनवे 6 सामने खेळला ज्यात तो फक्त 156 रन करू शकला.
advertisement
विजय शंकरलाही डच्चू
ऑलराऊंडर विजय शंकर यालाही सीएसके पुढच्या मोसमात डच्चू देऊ शकते. सीएसकेने विजय शंकरसाठी 1.2 कोटी रुपये मोजले होते, पण त्याला संपूर्ण मोसमात चमक दाखवता आली नाही. यंदाच्या मोसमात विजय शंकर 6 सामने खेळला, ज्यात त्याला फक्त 118 रन करता आल्या.
मुकेश चौधरीचं स्थानही धोक्यात
सीएसके पुढील हंगामात फास्ट बॉलर मुकेश चौधरीलाही रिलीज करू शकते. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु तो त्या पूर्ण करू शकला नाही. मुकेश चौधरीने 18 व्या हंगामात सीएसकेसाठी एकूण 2 सामने खेळले, ज्यामध्ये त्याला फक्त 1 बळी मिळाला.
दीपक हुडावरही टांगती तलवार
दीपक हुडाचाही या यादीत समावेश होऊ शकतो. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणाऱ्या दीपक हुडासाठी हा हंगाम खूप वाईट होता. दीपक हुडाने सीएसकेसाठी एकूण 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फक्त 32 रन केल्या. सीएसकेने 1.7 कोटी रुपये खर्च करून दीपक हुडाला टीममध्ये घेतले, पण आता सीएसके पुढच्या मोसमात दीपक हुडापेक्षा चांगला पर्याय शोधू शकते.