या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 187 रन केले. ओपनर आयुष म्हात्रेने 20 बॉलमध्ये 43 तर डेवाल्ड ब्रेविसने 25 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने 32 बॉलमध्ये 39 रन केले. राजस्थानकडून युधवीर सिंग आणि आकाश मढवाल यांना 3-3 विकेट मिळाल्या. तर तुषार देशपांडे आणि वानिंदु हसरंगा यांनी 1-1 विकेट घेतली.
advertisement
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. जयस्वालने 19 बॉलमध्ये 36 रन केले, तर वैभव सूर्यवंशीने 33 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. कर्णधार संजू सॅमसनने 41 रन केले. याशिवाय ध्रुव जुरेलने 12 बॉलमध्ये नाबाद 31 आणि शिमरन हेटमायरने 5 बॉलमध्ये नाबाद 12 रन केले.
या सामन्यासोबतच राजस्थानचा यंदाचा मोसम संपला आहे. या हंगामातल्या राजस्थानच्या सगळ्या मॅच झाल्या आहेत. या मोसमात राजस्थानने 14 सामन्यांपैकी फक्त 4 मॅच जिंकल्या तर 10 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. राजस्थानची टीम सध्या पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा शेवटच्या सामन्यातही पराभव झाला तर राजस्थान या मोसमात नवव्या क्रमांकावरच राहिल.