ओपनिंगला आलेल्या केएल राहुलने 65 बॉलमध्ये नाबाद 112 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर अभिषेक पोरेलने 19 बॉलमध्ये, अक्सर पटेलने 16 बॉलमध्ये 25 आणि ट्रिस्टन स्टब्सने 10 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले. केएल राहुलने शतकी खेळी केली असली तरी दिल्लीच्या पराभवाला तोच जबाबदार असल्याचं म्हणावं लागेल, कारण केएल राहुलने शेवटच्या बॉलपर्यंत बॅटिंग करून 172.31 च्या स्ट्राईक रेटने रन केल्या.
advertisement
केएल राहुल शेवटच्या बॉलपर्यंत खेळल्यामुळे दिल्लीचे फिनिशिर असलेले समीर रिझवी, आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांना बॅटिंगची संधीच मिळाली नाही. आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांनी आयपीएलच्या यंदाच्या मोसमात तळाला येऊन 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने आपण बॅटिंग करू शकतो हे दाखवून दिलं आहे, पण केएल राहुलमुळे या दोघांनाही बॅटिंगची संधी मिळाली नाही.
दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचणं संकटात
गुजरातविरुद्धच्या या पराभवामुळे दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचणं आणखी अवघड झालं आहे. दिल्लीला आता प्ले-ऑफला पोहोचायचं असेल तर त्यांना त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत, तसंच मुंबई त्यांचे उरलेले दोन सामने जिंकणार नाही हेदेखील पाहावं लागणार आहे. मुंबईचे उरलेले दोन सामने दिल्ली आणि पंजाबविरुद्ध आहेत, तर दिल्लीही त्यांच्या उरलेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई आणि पंजाबविरुद्ध खेळणार आहे.